Posts

Showing posts from October, 2024

1. SHRI CHINTAMANI. KALAMB

Image
 श्री चिंतामणी भगवान कळंब जिल्हा -  श्री चिंतामणी गणेशाच्या जागृत वास्तव्याने प्रसिद्धीस असलेले श्री क्षेत्र कळंब जिल्हा यवतमाळ हे जागृत गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे समस्त यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे विदर्भातील प्रसिद्ध गणपती मंदिरापैकी श्री गणेश चिंतामणी मंदिर कळंब नावा नावाजलेले आहे कळंब शहर हे यवतमाळ वरून नागपूर रोडवर 21 किलोमीटरवर आहे वर्धेवरून यवतमाळ रोडवर 45 किलोमीटर तर नागपूर वरून 125 किलोमीटर आहे एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचा थांबा या ठिकाणी दिलेला आहे बस थांब्यावरून अगदी पाईच्या अंतरावर मंदिर आहे स्वतःच्या वाहनाने आल्यास पुर पुरेशी पार्किंगची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाची स्वतःची आहे  श्री चिंतामणी गणेश मंदिर भगवान इंद्र स्थापित असून एक जागृत देवस्थान आहे या मंदिरामध्ये प्रवेशाला जाण्यापूर्वी चार मुखी गणपतीचे दर्शन होते त्यानंतर 30 पायऱ्या जमिनीच्या खाली उतरावे लागतात त्या ठिकाणी गणेश कुंड प्रथम दर्शनी भागामध्ये आहे व त्यासमोरच श्री गणेशाची चिंतामणीची विलोभनीय आकर्षक मूर्ती दृष्टीस पडते श्री गणेशाचे दर्शन मनाला आनंदी करते मंदिरामध्ये प्रवेश...